शिवसेना नेते शहाजीबापू पाटील यांना कॅन्सर? भाजपवर संताप व्यक्त करत स्वतःची दिली महत्वाची माहिती…


सांगोला : राज्याच्या राजकरणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच बिगुल वाजल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची राजकीय समीकरण जुळवण्याची तयारी सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.

तसेच सांगोला नगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. येथे शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील हे भाजपसह इतर सर्व पक्षांविरोधात एकटे पडल्याचे चित्र आहे.

या परिस्थितीमुळे संतापलेल्या शहाजी बापूंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, मी तुमचा कोणता शब्द मोडला? असा सवाल विचारला आहे. लोकसभा निवडणुकीत आजारी असतानाही भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याची आठवण करून देत, आता आजारपणाने कॅन्सरकडे वळल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपच्या या भूमिकेमुळे देवेंद्र फडणवीस यांनी याचा विचार करायला हवा होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

दुसरीकडे, भाजप नेते जयकुमार गोरे यांनी शहाजी बापूंनी नगराध्यक्षपदासाठी आनंदा माने यांची उमेदवारी आधीच जाहीर केल्याने युती होऊ शकली नाही, असा प्रतिसवाल केला. सांगोल्यात भाजप, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यासह इतर पक्ष एकत्र आले असून, शहाजी बापू पाटील एकटे पडले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!