Shirur : हवेलीत माऊली कटकेंचा ‘विजयी रथ’ चौफेर उधळला! दोन गावे सोडली तर तालुक्यात माऊलींचाच गजर….

Shirur : शिरुर -हवेली विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचे आव्हान स्विकारून मैदानात उतरलेल्या मुरब्बी राजकारणी अशोक पवार यांना अजित पवार यांचे पठ्ठे महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी आस्मान दाखविले असून अजित पवार यांचे आव्हान घेऊन प्रतिआव्हान देणाऱ्या अशोक पवार यांना नामुष्कीजन्य पराभव स्विकारावा लागला आहे. माऊली कटके यांनी शिरुर -हवेलीत आधीच्या मताधिक्याचे सर्व आकडे मोडीत काढून तब्बल ७४ हजार ५५० मताधिक्याने विजय संपादन केला असून हवेलीचा या विजयात ४७ हजार ५०७ इतका भरीव वाटा राहिला आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीत उभी फूट झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत एकमेव आमदार राहिलेले अशोक पवार हे शिरुर -हवेली मतदारसंघात चौथ्यांदा आपले नशीब आजमविण्यास उभे होते.समोर अगदी ‘अजित पवार येऊ द्या’ लोकशाहीत त्यांचे आव्हान स्विकारण्यास तयार असल्याचा अर्विभाव दाखवित निवडणूकीला सज्ज असणाऱ्या अशोक पवार यांना मात्र दारून पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. ‘घोडगंगा’ कारखान्याचे कर्ज नाकारल्याचा थेट आरोप करुन अजित पवार यांना टार्गेट करणारे अशोक पवार मात्र नवख्या माऊली कटकेंकडून मतदारसंघातून ७४,५५० मताधिक्याने पिछाडीवर पडले असून शिरुरने २७,०४३ पिछाडी दिल्यानंतर हवेलीत ४७, ५०७मतांनी पिछाडी दिली आहे. Shirur
स्वगृह असलेल्या माऊली कटके यांच्या हवेली तालुक्यात ३९ गावांत फक्त टिळेकरवाडी व न्हावी सांडस या दोन गावांत आघाडी मिळाली असून उर्वरीत ३७ गावांत माऊली कटकेंचा विजयी रथ बेफाम दौंडला आहे. अगदी राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाची पारंपारीक मते असलेल्या अनेक गावांत कटकेंचा विजयी
वारु चौफेर उधळला आहे.
हवेली तालुक्यातील गावांतील उमेदवार निहाय मते पुढीलप्रमाणे…
वाघोली – ८८४४ (अशोक पवार ) २९४४३ ( माऊली कटके ) २०५९९ ( कटके आघाडी ) ,
केसनंद+तळेरानवाडी २०७९ (अशोक पवार) ४८७५ (माऊली कटके) २७९६ (कटके आघाडी ),
पेरणे – १४३७ (अशोक पवार) ३३८ (माऊली कटके) १ ९४५ (कटके आघाडी ),
लोणीकंद – १६९३ (अशोक पवार) ३०५५ (माऊली कटके) १३६२ (कटके आघाडी
आव्हाळवाडी – १०२५ (अशोक पवार) ३४७१ (माऊली कटके) २४४६ (कटके आघाडी )
कोलवडी – १ ४५८ (अशोक पवार) ३१८७ (माऊली कटके) १७२९ (कटके आघाडी )
साष्टे – २३५ (अशोक पवार ) ७५९ (माऊली कटके) ५२४ (कटके आघाडी)
वाडेबोल्हाई – १११३ (अशोक पवार) १६५४ (माऊली कटके) ५४१ (कटके आघाडी )
पिंपरी सांडस- ८४० (अशोक पवार) १२६९ (माऊली कटके) ४२९ (कटके आघाडी)
अष्टापूर – ८३० (अशोक पवार) १२०२ (माऊली कटके) ३७२ (कटके आघाडी )
तुळापुर – ६८५(अशोक पवार) १०४९ (माऊली कटके) ३६४ (कटके आघाडी )
डोंगरगाव- ६२७ (अशोक पवार) १११४ (माऊली कटके) ४८७ (कटके आघाडी )
फुलगाव – ५०७ (अशोक पवार) १०२० (माऊली कटके) ५१३ (कटके आघाडी )
वढू खुर्द – ८३९ (अशोक पवार) १०४१ (माऊली कटके) २०२ (कटके आघाडी )
बुर्केगाव – ६०७ (अशोक पवार) ६८८ (माऊली कटके) ८१ (कटके आघाडी )
शिरसवडी – ५७४ (अशोक पवार) ६०६ (माऊली कटके) ३२ (कटके आघाडी)
हिंगणगाव – ४५५ (अशोक पवार) ५९६ (माऊली कटके) १४१ (कटके आघाडी )
बकोरी – ३७३ (अशोक पवार) ८९५ (माऊली कटके) ५२२ (कटके आघाडी )
शिंदेवाडी – ३१३(अशोक पवार) ५६६ (माऊली कटके) २५३ (कटके आघाडी )
बिवरी- ३५० (अशोक पवार) ३५६ (माऊली कटके) ६ (कटके आघाडी )
न्हावी सांडस – ६१४ (अशोक पवार ) ४०९ (माऊली कटके) २०५ (पवार आघाडी )
सांगवी सांडस – ३७८ (अशोक पवार ) ४११ (माऊली कटके) ३३ (कटके आघाडी )
कदमवाकवस्ती – ५१८८ ( अशोक पवार ) ६३३७ (माऊली कटके ) ११४९ (कटके आघाडी)
लोणीकाळभोर – ५२१५ ( अशोक पवार ) ८२७४ (माऊली कटके ) ३०५९ (कटके आघाडी)
कुंजीरवाडी – २०२१( अशोक पवार ) २५६५ (माऊली कटके ) ५४५ (कटके आघाडी)
आळंदी म्हातोबा – १५२३( अशोक पवार ) १८९४ (माऊली कटके ) ३७१ (कटके आघाडी)
तरडे – ६२८ ( अशोक पवार ) ७२८ (माऊली कटके) १०० ( कटके आघाडी)
थेऊर – १७४२ (अशोक पवार ) ३९०३ ( माऊली कटके ) २१६१ (कटके आघाडी)
नायगाव – ४४७ (अशोक पवार) १२६९( माऊली कटके ) ८२२ (कटके आघाडी)
पेठ – ४६९ ( अशोक पवार ) ९०१ (माऊली कटके ) ४३२ ( कटके आघाडी)
प्रयागधाम – ३९३ (अशोक पवार ) ६१३ (माऊली कटके ) २२४ ( कटके आघाडी)
कोरेगाव मूळ – ११८१ (अशोक पवार ) १२२९ (माऊली कटके) ४८ ( कटके आघाडी)
सोरतापवाडी – १०६२ (अशोक पवार ) २२५९ (माऊली कटके ) ११९७ ( कटके आघाडी)
वळती – ४२९ (अशोक पवार ) ७६० (माउली कटके) ३४१ (कटके आघाडी)
शिंदवणे – ९५४ ( अशोक पवार) १४४६ (माउली कटके) ४९२ ( कटके आघाडी)
उरुळी कांचन – ६५०७ पवार ८४६१ (माउली कटके) १९५४ (कटके आघाडी)
भवरापूर – २३४ ( अशोक पवार ) २४९ (माउली कटके ) १५ ( कटके आघाडी)
खामगावटेक – २४८ (अशोक पवार ) २६३ (माउली कटके) १५ (कटके आघाडी)
टिळेकरवाडी – ६२४(अशोक पवार), ३४५( माऊली कटके) ७१ (पवार आघाडी )
भावडी (आकडेवारी प्रसिद्ध नाही )