Shirur : मोठी बातमी! शिरुर लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट, मंगलदास बांदल यांची मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकरांशी गुप्तगू ..!!


जयदीप जाधव

Shirur उरुळीकांचन : शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून पूर्वाश्रमीचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊन त्यांची महायुतीकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याशी त्यांची सरळ लढत होणे अपेक्षित असताना शिरुर मतदारसंघात आणखी एक नवे टिव्स्ट् निर्माण झाले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती व पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील दबंग नेते मंगलदास बांदल हे शिरुर लोकसभेच्या आखाड्यात थेट उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे.

मंगलदास बांदल यांनी मागील दोन लोकसभा निवडणुकीची उतरण्याची तयारी केली होती.मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांची ऐनवेळी वरिष्ठ नेत्यांनी मनधरणी करुन त्यांना लोकसभा निवडणुकीत उभे राहण्यापासून परावृत्त केले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलेल्या पै. बांदल यांनी निवडणुकीत शड्डू ठोकण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.त्यानुसार बांदल यांनी लोकसभेची निवडणुक लढण्यासाठी आता तिसरा पर्याय शोधून गाठीभेटी सुरू ठेवण्याचा सिलसिला सुरू केल्याने शिरुर लोकसभेची रंगत वाढण्याची चिन्हे दिसत आहे.

बांदल यांनी आता उमेदवारी मिळविण्यासाठी मराठा आरक्षणाची हुक्कार पुकारलेले लढवैय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात असल्याची माहिती मराठा आंदोलकांकडून मिळत आहे. मराठा समाजाला अपेक्षित आरक्षण मिळाले नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आंदोलन उभे केले आहे. तसेच त्यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करुन मराठा समाजाला आपल्या उमेदवारांपाठिमागे एकवटण्याचे आव्हान केले आहे. त्यानुसार मागील काही दिवसांपासुन शिरुर लोकसभा लढविण्याची मनिषा असलेले पै.बांदल हे आंदोलकर्ते यांच्या मार्फत मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहे. त्यांची बांदल यांच्याशी उमेदवारीला पाठिंबा देण्याची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बांदल यांच्या तयारीला बळ आले आहे. Shirur

दुसरीकडे शिरुर लोकसभेसाठी बांदल यांनी वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. त्यांच्या मुंबईतील ‘राजगृह’ बंगल्यात अनेक बैठका झाल्याची चर्चा आहे.वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना पाठिंबा व उमेदवारी देण्याची ऑफर देऊ केली होती. अशावेळी बांदल हे आंबेडकर यांनाही पाठिंबा मिळविण्याची विनंती करु शकतात अशी चर्चा आहे.

दरम्यान बांदल यांच्या जरांगे व प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीने शिरूर लोकसभेत जोरदार उलटफेर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यात दबंग व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे मंगलदास बांदल हे सर्वपक्षांतून जनसंपर्क असलेले नेते आहेत त्यांना गत लोकसभा निवडणुकीत शरद पवार व अजित पवार यांनी राष्ट्रवादी चे अमोल कोल्हे यांचा प्रचार करण्याची गळ घातली होती.

त्यानुसार त्यांनी कोल्हेंचा प्रचार करुन त्यांच्या विजयात हातभार लावला होता. यापलिकडे बांदल हे भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्याशी सलोख्यात जपणारे आहेत. यापूर्वी त्यामुळे २००९ साली शिरुर -हवेली विधानसभेची निवडणूक लढवून आपली उपयोगीता दाखविली आहे. राजकारणात थेट पंगा घेणे त्यांची खासियत जिल्हा जाणून असल्याने पुणे जिल्ह्यात बारामती मध्ये विजय शिवतारे, पुण्यात वसंत मोरे यांच्यानंतर शिरुर मध्ये बांदल हे तिसरा भिडू म्हणून उभे राहिल्यास शिरूर मध्ये धांदल उडविल्यास आश्चर्य वाटायला नको.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!