Shirur : शिरुर -हवेलीत ४ लाख ६६ हजार ०४२ मतदार! ११ उमेदवार निवडणूक रिंगणात; निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज…!!


जयदिप जाधव

Shirur उरुळीकांचन : शिरुर-हवेली विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला असून मतदार राजा आता २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठी तयार झाला असून काहीही झालं तरी शिरुर हवेलीतील मतदारांचे ठरलंय ते म्हणजे ‘मतदान करायचंय’. मतदारांचा उत्साह पाहता निवडणूक यंत्रणा देखील मतदान जनजागृती, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी व मतदारांना सुरक्षित आणि सुलभ मतदान करता यावे म्हणून अहोरात्र कामकाज करीत आहे.

विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ मध्ये शिरुर तालुक्यातील काही गावे व पूर्व हवेलीतील काही गावे मिळून नवीन शिरुर-हवेली विधानसभा (१९८) मतदारसंघ तयार झाला. यामध्ये वाघोली, शिरुर शहर, उरुळीकांचन, लोणीकाळभोर, कदमवाकवस्ती, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे यासारख्या मोठ्या गावांचा समावेश आहे. जवळपास ९४ लहान मोठी गावे संपूर्ण मतदार संघात आहेत. पुणे शहरालगत झपाट्याने वाढणाऱ्या शहरी भागासह ग्रामीण पट्ट्यातील मतदारांमधून विधानसभेचा सदस्य विधिमंडळात प्रतिनिधित्व करण्यासाठी जात असतो. पाणी, वाहतुक कोंडी, कचरा, बेरोजगारी, रस्ते, ड्रेनेज आदी प्रमुख समस्या प्रामुख्याने या मतदार संघात आहेत.

शिरुर-हवेली मतदार संघात सद्यस्थितीत ४६६०४२ मतदार आहेत. यामध्ये २४१७८७ पुरुष मतदार, २२४२३२ महीला मतदार तर २३ तृतीयपंथी मतदार मतदानाचा हक्क एकूण ४५७ मतदान केंद्रावर बजावणार आहे. यापैकी शिरूर तालुक्यात २ लाख १३ हजार ४०३ मतदार असून त्यापैकी १ लाख ८ हजार ७७ पुरुष मतदार तर १ लाख ५ हजार ३१६ महिला मतदार व १० इतर मतदार आहेत. हवेली तालुक्यात २ लाख ५२ हजार ६३९ मतदार असून त्यापैकी १ लाख ३३ हजार ७१० पुरुष मतदार तर १ लाख १८ हजार ९१६ महिला मतदार व १३ इतर मतदार आहेत. शिरूरपेक्षा हवेली तालुक्यात ३९,२३६ मतदार जास्त आहेत. शिरुर-हवेली मतदार संघाची भौगोलिक रचना बघितली तर हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची, वळती पासून शिरुर शहरापर्यंत दक्षिण उत्तर तर हवेली तालुक्यातील तुळापूर पासून शिरुर तालुक्यातील तांदळी गावापर्यंत पूर्व पश्चिम पसरलेला आहे. या मतदारसंघात सद्यस्थितीत १० लाखांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. Shirur

आत्तापर्यंत शिरुर हवेली विधानसभेत तीन सार्वत्रिक विधानसभा निवडणुका पार पडल्या असून २०२४ ची चौथी सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. मतदारांची संख्या दिवसागणिक नवीन मतदार वाढत असताना मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत. मतदारांना आपला पवित्र हक्क बजावता यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील तेवढ्याच तत्परतेने काम करीत आहे. शिरुर हवेली विधानसभेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक ३ तथा उपजिल्हाधिकारी संगीता राजापूरकर तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के कामकाज पाहत आहेत. तीन हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचा निवडणूक कामकाजात सहभाग असणार आहे.

शिरुर २०२४ विधानसभा निवडणूक लढविणारे उमेदवार व कंसात पक्ष…

अशोक रावसाहेब पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार )
ऍड. विशाल शंकर सोनवणे (बहुजन समाज पार्टी)
ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
चंद्रशेखर ज्ञानेश्वर घाडगे (संभाजी ब्रिगेड पार्टी)
डफळ तुकाराम नामदेव (सैनिक समाज पार्टी)
विनोद वसंत चांदगुडे (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी)
अशोक गणपत पवार (अपक्ष)
अशोक रामचंद्र पवार (अपक्ष)
दत्तात्रय बबन काळभोर (अपक्ष)
नाथाभाऊ शिवराम पाचर्णे (अपक्ष)
राजेंद्र वाल्मिक कांचन (अपक्ष)

मागील विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान टक्केवारीत कंसात त्यावेळी असणारी एकूण मतदार संख्या..
२००९ : ६४.२८ टक्के (२८५१२९)
२०१४ : ६९.६४ टक्के (३१०४८९)
२०१९ : ६७.३१ टक्के (३८४३२३)
२०२४ ची एकूण मतदार संख्या (४६६०४२)

२०२४ च्या शिरुर हवेली विधानसभा निवडणुकीत वयोमानानुसार सरासरी मतदार टक्केवारीत…
१८ ते २५ : १४ टक्के
२६ ते ३५ : २६ टक्के
३६ ते ५० : ३२ टक्के
५१ ते ६० : १३ टक्के
६० वर्षावरील : १५ टक्के

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!