Shirur : दुर्दैवी! शिरूरमध्ये १२ वर्षाच्या चिमुकल्याचा वीजेचा धक्का लागल्याने मृत्यू, परिसरात हळहळ…

Shirur : क्रिकेट खेळताना पत्र्यावर अडकलेला बॉल काढण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यातील पाबळ गावात रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.

हर्षल पिंगळे असं मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, हर्षल पिंगळे या बारा वर्षीय मुलाचा खेळत असताना चेंडू घरावरील पत्र्यावर गेला होता. तो काढण्यासाठी संध्याकाळच्या सुमारास हर्षल हा घरावरील पत्र्यावर चढला. चेंडू घेऊन खाली उतरत असताना घरावरुन गेलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाला. Shirur

दरम्यान, पांडुरंग ढोले यांनी लाकडी काठीने हर्षल याला बाजूला करत जवळील रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी हर्षल पिंगळे याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राकेश मळेकर करत आहेत.