शिंदेंचं ठरलं!महापालिका निवडणुका स्वबळावर की महायुतीसोबत? काय केली मोठी घोषणा…

पुणे : आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.कोण युती आघाडी करत आहे, हा त्यांचा प्रश्न आहे, लोकशाहीमध्ये कोणीही युती आघाडी करू शकतो, परंतु मला विश्वास आहे, केलेल्या कामाच्या जोरावर महायुतीच जिंकणार, महायुती केलेल्या कामांच्या जोरावर निवडणूक लढवणार, पालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकेल असं शिंदे यांनी म्हटलं आहे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, महायुती केलेल्या कामांच्या जोरावर निवडणूक लढवणार, पालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकेल. महायुतीला केलेल्या कामाची पोचपावती विधानसभा निवडणुकीत मिळालेली आहे, असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान ठाकरेंच्या आरोपांना कामातून उत्तर देत आलो आहे, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती पहाता या निवडणुकांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपकडून विभाग बैठकांचा धडाका सुरू असून, या बैठकांमधून त्या-त्या विभागांमध्ये येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीचा आढावा सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट देखील जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार याचं चित्र अद्याप स्पष्ट नाही.

