पतीसोबतचे वाद मिटवायला ‘देवऋषी’कडे गेली; पुढे घडलं धक्कादायक….पुण्यात भोंदू बाबाचा अघोरी प्रकार उघड


पुणे : पुणे मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून एका भोंदू बाबाने अघोरी कृत्य करत महिलेचे शोषण केल्याची घटना उघड झाली आहे. वैवाहिक वाद मिटवून देणे, नोकरी लावणे आणि गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरोपीने ४२ वर्षीय महिलेची फसवणूक केली.

या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध कारणे सांगून आरोपीने त्या महिलेकडून तब्बल ५० लाख ५५ हजार रुपये उकळून मोठी आर्थिक फसवणूक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी औदुंबर मनोहर गडदे (४३) याने स्वतःची ओळख देवऋषी (भोंदू बाबा) अशी करून दिली होती. पीडित महिलेचे तिच्या पतीसोबत काही कौटुंबिक मतभेद होते. हे वाद मिटवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन त्याने महिलेशी जवळीक साधली.

त्यानंतर, त्याने महिलेला विश्वासात घेऊन स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. केवळ इतक्यावरच न थांबता, आरोपीने पीडित महिलेला लोणेरे, कुत्तेखोल आणि माणगाव यांसारख्या विविध ठिकाणी बोलावून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले. या काळात त्याने महिलेला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

तसेच गुंतवणुकीतून मोठी रक्कम मिळवून देण्याचे खोटे स्वप्नही दाखवले. या प्रलोभनातून त्याने महिलेकडून वेळोवेळी ५० लाख ५५ हजार रुपये उकळले. हा प्रकार २७ मे २०२१ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत घडत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपीने वारंवार भीती दाखवून आणि फसवणूक करून महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने धाडस एकवटून स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.

या तक्रारीवरून स्वारगेट पोलिसांनी आरोपी औदुंबर मनोहर गडदे याच्या विरोधात लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. आरोपीने अशाच प्रकारे इतर महिलांचीही फसवणूक केली आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!