ऐश्वर्या रॉयचा मोठा गौप्यस्फोट! अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्यावर केला खुलासा, नेमकं काय म्हणाली?


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने दिलेल्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती आपल्या सासऱ्यांबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना दिसते.

तसेच २००७ मध्ये अभिषेक बच्चनसोबत विवाहबंधनात अडकलेल्या ऐश्वर्या रायने अनेक वर्षे आनंदी संसार घालवला. मात्र, काही महिन्यांपासून त्यांच्या नात्याबद्दल विभक्ततेच्या चर्चेला उधाण आले आहे.

या चर्चांवर ना ऐश्वर्या, ना अभिषेक आणि ना बच्चन कुटुंबातील कोणीही भाष्य करताना दिसले. त्यामुळे चाहत्यांमध्ये कुतूहल अधिक वाढले आहे. एका मुलाखतीत ऐश्वर्या रायला विचारण्यात आले की, प्रसिद्ध अभिनेते आणि तुझे सासरे अमिताभ बच्चन यांच्याशी तुझे नाते नेमके कसे आहे? यावर ऐश्वर्याने अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली.

ती म्हणाली, मी त्यांचा खूप आदर करते. ते माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. ज्या पद्धतीने मला स्वीकारले आणि प्रेम दिले, त्याबद्दल मी सदैव आभारी आहे. या वक्तव्याने चाहत्यांनी बच्चन कुटुंबातील नातेसंबंधांबद्दल असलेल्या अनेक अफवांना उत्तर मिळाल्याचे म्हटले आहे. ऐश्वर्याने आपल्या सासऱ्यांचा उल्लेख करताना सन्मान आणि आत्मीयता या दोन्ही भावना व्यक्त केल्या.

ऐश्वर्या राय बच्चन ही काही वर्षांपूर्वी अनंत अंबानीच्या लग्नसमारंभात बच्चन कुटुंबासोबत दिसली होती. तिच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्यात नेहमीच आपुलकी आणि आदराची भावना दिसून येते. अमिताभ सर माझ्यावर एका मुलीसारखं प्रेम करतात, असं ऐश्वर्याने आणखी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!