कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण; पेट्रोल-डिझेलचे दर काय? वाचा आजचे ताजे भाव

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच सरकारी सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवण्याची कोणतीही योजना नसल्याचे सांगण्यात आले आहे.
आज, २४ सप्टेंबर २०२६ रोजी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कालच्या तुलनेत स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोल १०२.१२ रुपये, तर डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १११.३१ रुपये आणि डिझेल ९७.९७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात किंचित घट
बुधवारी कच्च्या तेलाच्या दरात जोरदार वाढ झाल्यानंतर गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात किंचित घसरण पाहायला मिळत आहे. मात्र, कच्च्या तेलाचा दर अद्याप १०० डॉलर प्रति बॅरलच्या मानसिक पातळीच्या वर आहे.


ब्रेंट क्रूडच्या किंमतीत आज सुमारे १.१८ टक्क्यांची घट झाली असून ते १०२.१८ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. बुधवारी ब्रेंट क्रूडमध्ये सुमारे ४ टक्क्यांची वाढ झाली होती आणि तो १०३.०८ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाला होता.
अमेरिकन क्रूड ऑइल सध्या ९१.६८ ते ९२.०० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यवहार करत आहे.
प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
शहर — पेट्रोल — डिझेल
दिल्ली — ₹१०२.१२ — ₹९५.२०
मुंबई — ₹१११.३१ — ₹९७.९७
फरीदाबाद — ₹१०३.२८ — ₹९६.१०
चेन्नई — ₹१०७.७८ — ₹९९.५६
लखनौ — ₹१०१.८६ — ₹९५.३६
पटना — ₹११३.३५ — ₹९९.३६
नाशिक — ₹११२.४६ — ₹९८.२०
भोपाळ — ₹११५.४१ — ₹१००.४७
अहमदाबाद — ₹१०२.५८ — ₹९८.७०
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?
पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार सुरू असले तरी, सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीतील संभाव्य चढ-उतार लक्षात घेऊन सरकार ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत आहे. याअंतर्गत तेल विपणन कंपन्यांना सबसिडी देण्याचा पर्यायही विचारात घेतला जाऊ शकतो. त्यामुळे कंपन्यांवरील वाढत्या खर्चाचा दबाव कमी ठेवण्यास आणि ग्राहकांवर त्याचा थेट परिणाम होऊ नये यासाठी मदत होऊ शकते.
त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असली तरी, सध्या सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.