Sharad Pawar : अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधी काही वेळातच शरद पवारांनी अचानक आपला उमेदवार बदलला, राजकीय घडामोडींना वेग…


Sharad Pawar : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक असताना शरद पवार यांनी मोठं पाऊल उचलत उमेदवारच बदलला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शदर पवार गटाकडून मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती.

सिद्धी कदम या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या उमेदवार ठरल्या होत्या. मात्र त्यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले होते. आता शरद पवार यांनी मोठं पाऊल उचलत सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द केली असून सिद्धी यांच्याऐवजी राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्रदेखील दिले आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाकडून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून शरद पवार गटाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर झाली. Sharad Pawar

त्यामुळे अनेकांना धक्का बसला. मात्र यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांसह अनेक जण नाराज झाले होते. त्यानंतर काल मोहोळ मधील इच्छुक उमेदवारांनी शरद पवारांची भेट घेऊन उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. अखेर सिद्धी यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, शरद पवार आणि मोहोळ विधानसभेतील शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर सिद्धी कदम यांचा एबी फॉर्म रद्द करण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहीचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले. त्यामुळे सिद्धी यांची उमेदवारी रद्द झाली. त्या भेटीनंतर जयंत पाटील यांनी राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!