Sharad Pawar : यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा असणारा प्रतिभासंपन्न नेता म्हणजे शरद पवार…

Sharad Pawar : आज (ता. १२) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. शरद पवार यांच्या ८४ वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवारांनी ८५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त शरद पवार यांच्या पक्षाच्या ‘एक्स’ हँडलवर एक खास ट्विट करण्यात आले आहे.
या ट्विटमधून शरद पवारांच्या जीवनातील खास प्रसंग दाखवण्यात आले आहे. तर त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. या वाढदिवसानिमित्त शरद पवारांवर विविध क्षेत्रातून अनेक दिग्गज नेते,उद्योगपती अशी सगळी मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करतेय. यामध्ये सामान्य कार्यकर्ते देखील मागे राहिलेला नाहीये.
काटेवाडी ते दिल्ली (व्हाया बारामती-पुणे-मुंबई) हा गेल्या ७५ वर्षांचा पवार साहेबांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या विद्यार्थि दशेतील महाविद्यालयीन निवडणुका, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विधनसभेतील विरोधी पक्ष नेता, केंद्रीय मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्ष नेता, समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हा एक व्यापक साहेबांच्या रूपाने लोकांसमोर आहे.
वारकरी संप्रदाय, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षि शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, सत्यशोधक शारदाबाई पवार, मा. यशवंतराव चव्हाण या व अन्य महामानवांचा पुरोगामी विचार, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, विज्ञान, कृषी, क्रीडा, साहित्य, कला, संस्कृती, इ. क्षेत्रातील मान्यवरांचे तज्ज्ञांचे पुरोगामी विचार स्वीकारुन त्यांनी आपल्या जीवनाची जीवनकार्याची दिशा ठरवली आहे. Sharad Pawar
कोणत्याही सर्वसामान्य माणसाला समाजातील असामान्य व्यक्तिमत्त्वं जवळून पाहावीत, त्यांचं जीवनचरित्र त्यांची यशोगाथा, त्यांच्या जीवनातील यश-अपयश, त्यांच्या जीवनातील चढ-उतार, त्यांच्या जीवनातील वळणवाटा समजून उमजून घ्याव्यात असे प्रकर्षाने वाटत असते. मा. श्री. शरद पवार हे सुद्धा असेच एक असामान्य व्यक्तिमत्व असल्यामुळे सर्वांनाच त्यांच्याविषयी आदर आहे, त्यामुळे त्यांचे जीवनकार्य समजून उमजून घ्यावे असे सर्वांना वाटते. मलासुद्धा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांच्याबद्दल आदर आहे, कुतूहल आहे.
पवारांचा जन्म डिसेंबर १२, इ.स. १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला .कोरेगाव तालुक्यातील नांदवळ हे साहेबांचे मुळगाव, शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे. गोविंदराव हे निरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे बराच् काळ सेक्रेटरी होते.
पुढे ते बारामती येथे निघालेल्या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक झाले. शारदाबाई या १९३८ मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या बारामतीच्या लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या सुकन्या आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत.
१९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.वि द्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.प वारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.
त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.
१९६७ मध्ये शरद पवार २७ वर्षांचे असताना बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. आमदार म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडोली. वयाच्या ३८ व्या वर्षी, शरद पवार यांनी जनता पक्षासह सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस सोडली. १९७८ साली ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले.
दरम्यान, १९८८ साली ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. १९९१ मध्ये नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये शरद पवार पंतप्रधान हे संरक्षण मंत्री झाले. तर २००४ मध्ये ते यूपीए सरकारमध्ये केंद्रीय कृषीमंत्री झाले. पंतप्रधानपदाचं त्याचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं.