Sharad Pawar : झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवार यांचे मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar : राज्यातीलच नव्हे तर देशातील वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असेल.
विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून शरद पवार हे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांना ही सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. Sharad Pawar
शरद पवार यांनी या निर्णयावर पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना म्हटले की, मला या सुरक्षा व्यवस्थेची माहिती नाही. गृहखात्याचे अधिकारी आले आणि सांगितले की, झेड प्लस सुरक्षा मिळणाऱ्या तीन लोकांमध्ये मी, मोहन भागवत आणि अमित शाह यांचा समावेश आहे.
निवडणुका नजिक आल्यामुळे सुरक्षा देण्यात आलेली असावी. माझ्या दौऱ्याची माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते. त्यांनी या निर्णयावर गृहमंत्रालयातील संबंधित व्यक्तीशी संवाद साधून पुढील निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे.
शरद पवारांना सुरक्षा पुरवल्यावर निलेश राणेंची टीका…
याच मुद्द्यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी सोशल मीडियावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, ५५ सीआरपीएफ जवान त्यांना सुरक्षा देतील. याचा अर्थ त्यांना कोणापासून धोका आहे हे समजत नाही. ५० वर्षे देशभर फक्त सत्तेवर बसले तरी झेड प्लस सुरक्षा मिळते का?, निलेश राणे यांच्या या टीकेमुळे चर्चा सुरू झाली आहे.