अजित पवारांच्या लेकाच्या साखरपुड्याबद्दल विचारताच शरद पवार भडकले, म्हणाले, हा काही प्रश्न…

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा मुलगा जयचं लग्न ठरलं आहे. बारामतीचा हा लेक फलटणच्या पाटील कुटुंबाचा जावई होणार आहे. जयची आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जयचं लग्न ठरल्याचं जाहीर केलं आहे.
अजित पवार यांचा लेक जय पवार यांचा साखरपुडा आहे आणि जय पवार आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीने शरद पवारांची भेट घेतली. जय पवारच्या साखरपुड्याला जाणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला असता ते भडकले आणि म्हणाले की, हा काही प्रश्न आहे का विचारायचा?. असे शरद पवार म्हणाले आहे.
राज्यातील वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल बोलताना नुकताच शरद पवार हे दिसले आहेत. पवार म्हणाले की, शेतकरी आत्महत्यांसंबंधित केंद्राने धोरण आखावे. राज्यातील काही ठिकाणची परिस्थिती बिघडली आहे. काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केला.
सत्तेचा गैरवापर होत असेल तर सरकारने याची दखल घ्यायला हवी. यावेळी शरद पवार हे बीडच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना देखील दिसले ते म्हणाले की, बीडमध्ये आजच्यासारखी परिस्थिती कधीही बघायला मिळाली नव्हती. राज्यात सगळीकडे धार्मिक वातावरण नाहीये.
पुढे शरद पवार म्हणाले की, निवडणुका होत राहतात, पुढच्या निवडणुकांवर अजून ठरवलं नाहीये. जयंत पाटील हे पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा सातत्याने रंगताना दिसतंय, याबद्दल एक विधान जयंत पाटलांनी केले होते.
त्यानंतर जयंत पाटील हे काल बारामतीमध्ये गेले होते, यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, जयंत पाटलांनी त्यांची भूमिका कालच स्पष्ट केलीये. बीडबद्दल बोलताना पवार म्हणाले, बीडमध्ये मी स्वत:लक्ष देत होतो, निर्णय घेत होतो. आता मात्र, परिस्थिती बिघडली आहे.