शरद पवार गटाचा अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा; उद्याच्या मोर्चापूर्वी मोठी राजकीय घडामोड..


मुंबई : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात २ ऑक्टोबर रोजी मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. शिवाजी पार्क येथे प्रस्तावित आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर दीपके यांनी ‘जेलभरो आंदोलन’ करण्याचा निर्णय जाहीर केला.

दरम्यान, या आंदोलनाला शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. मात्र, शरद पवार स्वतः या आंदोलनात सहभागी होणार आहेत की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

सुप्रिया सुळे यांनी २ ऑक्टोबरच्या दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच ४ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मोर्चालाही राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. ठाकरे बंधूंचा ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा होणार असून, त्यासाठी विरोधी पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२ ऑक्टोबरला ‘जेलभरो’ आंदोलन

अभिजीत दीपके यांनी २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे ‘जेलभरो आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, शिवाजी पार्क येथे आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशाचा आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित कारणांचा दाखला दिला आहे.

त्यामुळे २ ऑक्टोबरच्या आंदोलनाबाबत पुढे काय घडते, तसेच ४ ऑक्टोबरच्या ठाकरे बंधूंच्या मोर्चात कोणते नेते सहभागी होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!