Sharad Pawar : बारामतीकर युगेंद्रला नक्कीच विजयी करतील!! शरद पवारांनी थेट गणितच सांगितलं, म्हणाले, बारामतीकरांची माहिती….

Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. नेत्यांकडून विरोधकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २९ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे.
दरम्यान आज बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात तुतारी चिन्हावर लढण्यासाठी युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार उपस्थित होते.
तसेच युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीकर युगेंद्र पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवार म्हणाले, मी हे म्हणणं योग्य आहे की नाही पण बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे, तेवढी माहिती क्वचितच कोणाल असू शकेल. माझा बारामतीकरांवर पूर्ण विश्वास आहे. मला महाराष्ट्राच्या राजकारणात शक्ती देण्याचं काम बारामतीकरांनी केलं. त्याची सुरुवात १९६५ सालापासून ते आजपार्यंत आहे. Sharad Pawar
मी आतापर्यंत इतक्या निवडणुकींना उभा राहिलो. सुरुवातीच्या काळात मला इथं राहावं लागायचं. नंतरच्या कालावधीत माझी जबाबदारी बारामतीकरांनी घेतली. त्यामुळे या बारामतीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांना मोठ्या मतांनी विजयी करतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.