शरद पवार अन् अजित पवार 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा येणार एकत्र, राजकीय चर्चांना उधाण…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संवाद कमी झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच पुण्यात एका बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भेटले होते. यामुळे ते एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
तसेच सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीवेळी अजित पवार आणि शरद पवार हे शेजारीच बसले होते. आता 21 एप्रिलला पुण्यातील साखर संकुल येथे होणाऱ्या AI विद्याच्या बैठकीसाठी दोन्ही पवार एकत्र येणार आहेत. यामुळे त्यांची जवळीकता वाढली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
गेल्या 10 दिवसांत दोघांची तिसऱ्यांदा भेट होणार आहे. 21 एप्रिलला होणाऱ्या AI विद्याच्या बैठकीसाठी दोन्ही पवार एकत्र येणार आहेत. नुकतेच जय पवार यांच्या साखरपुड्यात शरद पवारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबीय कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रीत आलेले पहावयास मिळाले.
आता अनेक ठिकाणी दोन्ही पवार एकत्र येत असल्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे. जय पवार यांचा साखरपुडा पुण्यानजीकच्या फार्म हाऊसवर पार पडला. या कार्यक्रमास शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली होती. जय पवार यांना आर्शिवाद देण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्र आल्याचे बघायला मिळाले.
यामुळे येणाऱ्या काळात काही राजकीय घडामोडी घडणार का? हे लवकरच समोर येईल. सध्या राज्यात राष्ट्रवादीमध्ये देखील घुसपुस सुरू असल्याचे सांगितले जात आहे. जयंत पाटील हे देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे.