Sharad Pawar : तब्बल ४० वर्षांनंतर रायगडावर जाऊन शरद पवार यांनी फुंकले रणशिंग, नवीन चिन्हांचे केले अनावरण…


Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असं निवडणूक चिन्ह दिलं आहे. हे ऐतिहासिक चिन्हाचं अनावरण शरद पवार गटाने किल्ले रायगडावर जाऊन केले. किल्ले रायगडावर आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी हजर होते. तुतारी हे चिन्ह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.

रायगड किल्ल्यावर पक्षाच्या अनावरण चिन्हासाठी शरद पवार हे तब्बल ४० वर्षांनी किल्ल्यावर आले. आधी रोप-वे आणि मग पालखीतून शरद पवारांना किल्ल्यावर नेण्यात आले. त्याठिकाणी पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह पक्षाच्या नव्या चिन्हाचं अनावरण करण्यात आले.

यावेळी शरद पवार म्हणाले की, सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. Sharad Pawar

निवडणूक आयोगाने रणशिंग फुकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिहासिक भूमीत आपण आलोय. याठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करूया असं त्यांनी म्हंटले आहे.

तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र किल्ल्यावर पक्षाच्या चिन्हाचे अनावरण होतंय. ही तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसात स्वाभिमानाचं प्रतिक बनलीय. महाराष्ट्राच्या काळजातील तुतारी आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकारी होईल. शरद पवारांच्या नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राहण्यासाठी प्रयत्नशील राहील असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!