मेहुणीसोबत लैगिंक संबंध अनैतिकच, पण मुलगी सज्ञान असेल तर तो बलात्कार होत नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

दाजी- मेहुणीचे लैंगिक संबंध जरी अनैतिक असले तरी मुलगी जर संज्ञान असेल तर याला बलात्कार म्हणता येणार नाही, असा मोठा निकाल हायकोर्टाने दिला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. मेहुणीवर बलात्कार केल्या प्रकरणात आरोपीला अलाहाबाद हायकोर्टाने जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे.
याबाबत एका प्रकरणात आरोपीला जुलै २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. आता मात्र पत्नीच्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्या पतीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. संबंध अनैतिक असले तरी महिला प्रौढ असेल तर त्या नात्याला बलात्कार मानता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात क्लायंटवर खोटे आरोप करण्यात आले आहेत. मेहुणा आणि मेहुणी यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले होते. याची माहिती याचिकाकर्त्याला मिळाल्यानंतर त्यांनी एफआयआर दाखल केला. या प्रकरणाची समीर जैन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
मुलगी प्रौढ आहे तिने आपल्या जबाबात आरोप फेटाळले आहेत. त्यानंतर कलम १६४ सीआरपीसी अंतर्गत जबाब बदलण्यात आला आणि फिर्यादी पक्षाच्या खटल्याचे समर्थन करण्यात आले. कथित पीडित मुलगी प्रौढ आहे आणि तिने संबंधासाठी संमती दिली नाही, हे रेकॉर्डवरून दिसून येत नाही, असेही सांगितले गेले.
दरम्यान, अर्जदार आणि पीडितेमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाल्याचेही न्यायालयाने नमूद केले. पण महिला प्रौढ असल्याने याबाबत निर्णय घेण्यात आला. आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नव्हता. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे.