स्वारगेट प्रकरणातील नराधमाचा लैगिंक अहवाल आला समोर, अहवालातही धक्कादायक माहिती उघड, आरोपी अडकणार की सुटणार?

पुणे : स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. नंतर आरोपी दत्ता गाडेच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी यश आले. आरोपी गाडेला पोलिसांनी नाट्यमयरीत्या त्याच्या गावातून अटक करण्यात आली. त्याला कडक शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.
आरोपी दत्ता गाडेविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरोधात आरोपपत्र गुन्हे शाखेने कोर्टात दाखल केले. गुन्हा घडल्यानंतर 52 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात अनेक साक्षीदार तपासले आहेत.
घटनास्थळावरून आरोपीचे केस आणि शर्टाचे बटण सापडले. तपासणीत ते आरोपी गाडेचेच असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी दत्ता गाडे हा लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल ससून रुग्णालयाच्या तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला. त्यामुळे आता आरोपी दत्ता गाडे हा या प्रकरणात पुरता लटकणार असल्याचे म्हटले जात आहे.
पंचनाम्यांतून आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचे थेट व परिस्थितीजन्य भक्कम पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणात आरोपी दत्ता गाडेच्या विरोधात पुरावे जमा करण्यात आले. सुनावणीच्या दरम्यान आरोपीच्या बचावासाठी कोणताही मुद्दा राहू नये याची काळजी घेण्यात आली आहे.
दरम्यान, स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये आरोपी दत्ता गाडे याने तरुणीवर दोनदा बलात्कार केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी अनेक पुरावे या प्रकरणात जमा केले. पुणे पोलिसांनी प्रथमच गुगल सर्च हिस्टरी आणि सीसीटीव्ही पंचनामा करून आरोपी गाडे गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचे शोधून काढले.