क्रिकेटविश्वात खळबळ! मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि…

मुंबई : काल मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार गेल्या आठवड्यात करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या शिवालिक शर्माला अखेर अटक करण्यात आली आहे. यामुळे याबाबत चर्चा सुरु आहे.
याबाबत माहिती अशी की, शिवालिक शर्मावर जोधपूर येथील एका युवतीने आरोप केला आहे. तिने म्हटले आहे की, त्याने माझ्याशी शारिरिक संबंध ठेवले आणि आपली फसवणूक केली आहे. मी २०२३ साली गुजरातमध्ये वडोदरा येथे फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी माझी आणि शिवालिक यांची भेट झाली. काही वेळातच आम्ही दोघे चांगले मित्र झालो.
त्यानंतर या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमचा साखरपुडा देखील झाला. त्यानंतर शिवालिकने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. जे मला मान्य नव्हते. पण त्यानंतर त्याने माझ्याशी नातं ठेवण्यास नकार दिला. यामुळे माझी मोठी फसवणूक झाली.
त्याने मला ओळख दाखवणे बंद केले आणि मला कोणतेही उत्तर तो देत नव्हता. माझ्याकडे तो सातत्याने दुर्लक्ष करत होता, असेही तिने सांगितले आहे. यामुळे आपण पोलिसांमध्ये तक्रार केल्याचे तिने सांगितले आहे. यामुळे अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून तपास सुरु आहे. शिवालिक शर्माने स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती.
त्याचे नाव लिलावात घेण्यात आले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाला शिवालिक शर्मासारखा युवा खेळाडू हवा होता. त्यामुळे मुंबईच्या संघाने त्याच्यावर सर्वाधिक २० लाख रुपयांची बोली लावली होती आणि त्याला आपल्या संघात दाखल केले होते. आता मात्र तो अडचणीत आला अहे.