पुण्यात कोयता गॅंगचा धुडगूस!! रात्रीची वेळ, हातात कोयता अन् सपासप वार, नेमकं काय घडलं?

पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
गेल्या कित्येक दिवसांपासून पुण्यात कोयता गँगनेही धूमाकूळ घातला असून त्याचाच एक ताजा व्हिडीओही समोर आला. रात्रीच्या वेळी, भररस्त्यात वेगाने, वाहनांची वर्दळ सुरू असतानाच, काही तरूणांचा एकमेकांशी वाद झाला, राडा झाला आणि त्यातील काही लोकांनी एकमेकांवर कोयत्याने सपासव वार करत जीवघेणा हल्लाच केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करून ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केलेत. पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे,अशी विनंतही त्यांनी केली आहे.
तसेच पुण्यातील बिबेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतच हातात कोयता घेऊन तरुणांच्या एका गटाने तूफान हाणामारी केली. भरधाव वेगाने गाड्या आजूबाजूला जात असतानाही त्याची पर्वा न करता रस्त्यात उभे राहून, तरूणांच्या गटाने एकमेकांवर धावून जात कोयत्याने सपासप वार केले.
दरम्यान, हा भयानक हल्ला तेथील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैदही झाला. दरम्यान याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे हल्ला करणारे तरूण म्हणजे कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे..
पोलिसांनी दिलेल्यच्या माहितीनुसार, सुरज भिसे, सुमित भिसे, आदित्य पवार आणि सतीश पवार या चार तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ते पुण्यातील सराईत गु्न्हेगार आहेत. यांनी यापूर्वीही अशाप्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या गुन्हेगारीचा रेकॉर्ड पाहून पोलिसांनी विशेष तपास सुरु केला, असेही सांगण्यात आले.