सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; बाजारात मोठा बदल, आजचे नवे भाव जाणून घ्या..

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असले तरी, गेल्या आठवड्याच्या तुलनेत आता दरात घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करावं की थांबावं, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाली असून, चांदीच्या दरातही काही प्रमाणात घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरत आहे.
मल्टि कमोडिटी एक्सचेंज वरील आकडेवारीनुसार, २४ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १,५२,६९९ रुपये होता, जो शुक्रवारी १,५१,२६३ रुपयांवर बंद झाला. म्हणजेच काही दिवसांत सोन्याच्या दरात १,३३६ रुपयांची घट झाली आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या अधिकृत संकेतस्थळानुसार, २४ एप्रिल रोजी १० ग्रॅम सोन्याचा भाव १,५१,४७९ रुपये होता, तो आता १,५०,२६३ रुपयांपर्यंत खाली आला आहे.

आज, ३ मे रोजी बाजार उघडल्यानंतर विविध कॅरेटच्या सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत:
२२ कॅरेट : प्रति १० ग्रॅम १,४६,६६० रुपये
२० कॅरेट : १,३३,७३० रुपये
१८ कॅरेट : १,२१,७१० रुपये
१४ कॅरेट : ९६,९२० रुपये
चांदीच्या दरांबाबत बाजारात संमिश्र चित्र दिसून आले. MCX वर चांदीचा दर २४ एप्रिलच्या २,५०,०५८ रुपयांवरून वाढून शुक्रवारी २,५१,००० रुपये प्रति किलो झाला. मात्र, देशांतर्गत किरकोळ बाजारात दरात घसरण दिसली.
IBJA च्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी एक किलो चांदीचा भाव २,४३,८२५ रुपये होता, जो १ मे रोजी २,४०,३३१ रुपयांवर आला. म्हणजेच चांदीच्या दरात ३,४९४ रुपयांची घट झाली आहे.
विशेष म्हणजे, चांदी तिच्या ऐतिहासिक उच्चांकी ४,५७,३२८ रुपयांच्या तुलनेत सध्या सुमारे २,०६,३२८ रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही संधी मानली जात असली तरी, बाजारातील अनिश्चितता कायम आहे.