एक सेल्फी… आणि थेट गुन्हा?’ मिसिंग लिंकवर थांबलात तर अडचण ठरलेली!


मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पण काही जण सेल्फीच्या मोहात वाहनं थांबवत असल्याने धोका वाढला आहे. आता मात्र हा मोह थेट गुन्ह्यात बदलू शकतो. महामार्ग पोलिसांनी कडक इशारा देत अशा प्रकारांवर दंडासह गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे.

मिसिंग लिंकवर वाहनं 100 ते 120 किमी प्रतितास वेगाने धावत असतात. अशा वेगात अचानक थांबणं म्हणजे अपघाताला निमंत्रण देणं ठरतं. त्यामुळेच पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, फोटो काढण्यासाठी थांबणं म्हणजे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणं आहे.

घाटातील कोंडी कमी करून प्रवास जलद करण्यासाठी उभारलेला हा प्रकल्प सुमारे 30 मिनिटांचा वेळ वाचवतो. महाराष्ट्र दिन निमित्त उद्घाटन झालेल्या या मार्गामुळे अपघात आणि ट्रॅफिकमध्येही घट झाली आहे.

दरम्यान, काही नेत्यांच्या सेल्फीमुळेही चर्चांना उधाण आलं आहे. मात्र सेल्फीसाठी थांबण्याचे प्रकार वाढल्याने प्रशासनाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!