लाडकी बहिण योजनेत मोठा घोटाळा!! बांगलादेशी महिलेने घेतला लाडक्या बहिणीचा लाभ, प्रशासन नेमकं करतंय काय?


मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एक मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये बांगलादेशी महिलने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलं आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून 5 बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला अटक करण्यात आली आहे.

यामध्ये अटक केलेल्यांपैकी एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. दक्षिण मुंबईतील कामठीपुरा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. बांगलादेशी जेव्हा भारतात येतात तेव्हा इथल्या एखाद्या एजंटला पकडून बनावट कागदपत्र तयार केली जातात.

नंतर ते भारतात राहून भारताचे रहिवासी असल्याचं दाखवतात. कागदपत्रांचा वापर करून या बांगलादेशी महिलेने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. यामुळे प्रशासनात किती मोठा घोळ असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

याबाबत कामाठीपुरा परिसरातून एका स्थानिक दलालालाही पोलिसांनी अटक केलेली आहे. 6 जमांवर ही अटकेची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये जी महिला आहे तिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचता लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्यभरामध्ये बांगलादेशी नागरिकाविरोधात कारवाई सुरू आहे, अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशनही सुरू आहे. त्यांच्यावरती कारवाई केली जात आहे. मुंबईतसुद्धा गुन्हे शाखेकडून वेगवेगळ्या माध्यमातून मोहीम राबवण्यात येत असून बांगलादेशी नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!