घरगुती उपचारांनी मुरमांना म्हणा बाय-बाय
पुणे : मुरमे बहुधा तरुणपणातच निघत असतात. ते चेहऱ्याची रयाच घालवत असतात. मुरमे जादा तेलकट त्वचा, बद्धकोष्ठता, कोंडा आणि तणावामुळे होत असतात. जर आपण मुरमांनी त्रस्त असाल तर बाजारू क्रीम लावण्याऐवजी काही घरगुती उपचार करा.
■ कडुलिंबाची पाने उकळा आणि त्या पाण्याने चेहरा धुवा.
■ मुलतानी मातीचा फेसपॅक मुरमांमध्ये फायदेशीर असतो, कारण मुलतानी माती त्वचेचे तेल कमी करीत असते.
■ बटाटा किसून चेहऱ्यावर लावा. आरामही मिळेल आणि डागही जातील.
■ बर्फाचा वापरही मुरमांपासून आराम देत असतो. १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर बर्फ लावून नंतर लवंग तेल लावावे.
■ निरशा दुधात थोडेसे बेसन मिसळून पेस्ट बनवावी व चेहऱ्यावर लावावी. थोडीशी सुकल्यानंतर धुवून टाकावी.
■ मध, दही व अंड्याच्या पांढऱ्या द्रावाचे मिश्रण तयार करावे आणि दिवसातून एकदा चेहऱ्यावर लावावे. मुरमापासून आराम मिळेल.
■ काकडीचा रसही मुरमांवर फायदेशीर असतो. काकडीचा रस गुलाबपाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावावा.
■ मुरमांना वारंवार हात लावू नये. अन्यथा इन्फेक्शन होण्याची भीती असते. चेहऱ्यावर कोणतेही
■ केमिकलयुक्त क्रीम लावू नये. कारण केमिकल त्वचा रूक्ष आणि कडक करून मुरमांना कायमस्वरुपी बनवत असते.
■ असामान्य हार्मोनल बदलामुळे मुरमे झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.