सातारा हादरला! AI चा गैरवापर करून महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओ बनवले, पुढे नको तेच घडलं..


सातारा : कराड शहरातील दोन नामांकित महिला डॉक्टरांचे AI च्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ बनवले गेल्याचं समोर आलं आहे. यामुळे ही एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना आहे. या प्रकारामुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली असून या तंत्रज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

याबाबत दोन महिला डॉक्टरांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, सोशल मीडियावर त्यांचे अश्लील व्हिडीओ शेअर करण्यात आले होते. तपासाअंती हे व्हिडीओ AI तंत्रज्ञानाने बनवले गेले त्यात संबंधित डॉक्टर महिलांना दोन तरुणांसोबत आक्षेपार्ह कृती करताना दाखवलं गेलं होतं. यामुळे सगळेच हादरले.

या व्हिडीओ बनावट आहे. तो परराज्यातून तयार करण्यात आले असल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. तपासादरम्यान पंजाबमधील विकास शर्मा या इसमाचा तपासात सहभाग निष्पन्न झाला असून, त्याने कबुल केलं की कराडमधीलच एक डॉक्टर राजेश शिंदे यानेच हे व्हिडीओ तयार करण्यास सांगितले होते.पोलिसांनी मोबाईल जप्त करून तपास सुरू केला आहे.

याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात IT ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामागचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर असल्याचं सांगतो. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व सहकारी दोघेही पोलिसांच्या ताब्यात असून, एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल.

दरम्यान, AI तंत्रज्ञानाचा वापर करून कुणाच्याही फोटोवर अश्लील क्लिप्स तयार करता येतात. त्यामुळे सोशल मीडियावर आपले खाजगी फोटो, व्हिडीओ अपलोड करताना काळजी घेणं गरजेचं आहे. सायबर क्राईम युनिटच्या मदतीने आरोपींचा ठावठिकाणा लावण्यात आला. हा प्रकार म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेक कसा घातक ठरू शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!