Satara Lok Sabha : साताऱ्यात ठरलं! उदयनराजे यांनाच तिकीट, ‘या’ पक्षाकडून उतरणार रिंगणात…


Satara Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे .

तसेच गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्याच्या जागेवरुन महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरू आहेत. अशातच आता साताऱ्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती भाजपचे विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. Satara Lok Sabha

उदयनराजेंची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून उद्याच घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहितीही रणजीत नाईक निंबाळकरांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीनंतर निंबाळकरांनी ही माहिती दिली आहे.

भाजपचे विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर बोलताना म्हणाले की, सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र महायुतीच्या प्रचाराचा नारळ माढा लोकसभेतील माळशिरस येथे फुटणार आहे. तसेच, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व सहयोगी पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर उपमुख्यमंत्री आपले कुलदैवत असणाऱ्या नीरा नरसिंहपूर येथे जाऊन नरसिंहाचे दर्शन घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

साताऱ्यात झळकले उदयनराजेंचे पोस्टर्स…

उद्या उदयनराजेंचा साताऱ्यात भव्य स्वागत सोहळा पार पडणार आहे. शिरवळपासून साताऱ्यात ठिकठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. अद्याप उदयनराजेंना पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

अशातच तिकीट जाहिर होण्या आगोदरच उदयनराजेंच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती मिळाली असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!