Sanjay Raut : अण्णा हजारे यांच्याकडून याचिका दाखल, अजित पवार अडचणीत, नेमकं प्रकरण काय? संजय राऊत म्हणाले…

Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना क्लीन चिट मिळाल्यावर एकदाचे सुटलो असे वाटत असताना याप्रकरणी न्यायालयात आव्हान देणारी याचिका समाजसेवक अण्णा हजारे दाखल केली आहे.

यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे पुन्हा अण्णा सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे.२०१४ पूर्वी काँग्रेस चे सरकार केंद्रात असताना अण्णा लोकपाल विधेयकासाठी दिल्लीत उपोषणास बसलेले होते. तेव्हा संपूर्ण देशात त्यांना पाठिंबा मिळत होता.
ते आंदोलन जग भर गाजले होते. असे असताना २०१४ नंतर केंद्रात सत्ता बदल झाला आणि अण्णा व त्यांचे आंदोलन थांबले होते. यावरून अण्णा सोशिअल मीडियातून प्रचंड ट्रोल झाले होते. यानंतर त्यांनी कुठेही सक्रिय आंदोलन केले नाही. Sanjay Raut

दरम्यान, आता क्लोसर रिपोर्टला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली. या संदर्भात याचिका दाखल करण्यास वेळ देण्यात आला आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांचे अभिनंदन केले आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, याबाबत अजित पवारांच्या प्रकरणात जसा रस घेतला तसाच एलोकट्रोल बॉण्ड प्रकरणात अण्णा नी लक्ष घालावे असा खोचक टोला राऊत यांनी लगावला. यामुळे या प्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.