Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊतांना १५ दिवसांचा तुरुंगवास, कोर्टाचा निकाल, नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरले आहेत. माझगाव सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा हा खटला दाखल केला होता.

या प्रकरणी संजय राऊत यांना १५ दिवसांची कैद सुनावण्यात आला आहे. २५ हजारांचा दंडही आकारण्यात आला आहे. शिवडी कोर्टाने निकाल दिला आहे. २०२२ सालचे हे प्रकरण आहे. मीरा भाईंदर शौचालय प्रकरणात मेधा सोमय्यांवर आरोप केला होता.
संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मीरा भाईंदर येथील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. Sanjay Raut

या निकालाची आज सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला. न्यायालयाने संजय राऊत यांना २५ हजारांचा दंड आणि १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. १५ दिवसाची कैद असल्याने संजय राऊत जामीनास पात्र आहे.

दरम्यान, त्यानंतर आता संजय राऊत यांना रितसर न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल. ते स्वत:ला सरेंडर करतील. त्यानंतर कोर्ट त्यांना जामीन मंजूर करण्याची शक्यता आहे. सुनावणीवेळी संजय राऊत कोर्टात उपस्थित नव्हते. परंतु कोर्टाने आपल्या नियोजीत वेळेत निकालाचे वाचन पूर्ण केले आहे.