Salman Khan : सलमानच्या घराजवळ गोळीबार, अमेरिकेत रचला कट, धक्कादायक माहिती आली समोर…


Salman Khan : बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घराबाहेर रविवारी, पहाटेच्या पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खान आपल्या कुटुंबीयांसह राहतो. सलमान खानला इशारा देण्यासाठी हा गोळीबार करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

या गोळीबाराप्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा कट एक महिन्यापूर्वीच रचण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अमेरिकेतच हा कट रचला गेला असी माहिती समोर आली आहे. रविवारी पहाटे ४.५० वाजता बाईकवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला. त्यांनी अनेक राऊंड फायर केल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, फायरिंगचा हा कट अमेरिकेत रचला गेल्याचेही समोर आले आहे. तसेच वेगवेगळ्या नंबर्सवरून शूटर्सना या गोळीबाराचा आदेश देण्यात आला होता, अशी माहितीही उघड झाल्याचे वृत्त आहे. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे. Salman Khan

अनमोल बिश्नोई याने फायरिंगची जबाबदारी रोहित गोदारा याच्याकडे सोपवली होती. गोदारा याच्याकडे १२ पेक्षाही जास्त प्रोफेशनल शूटर्स असल्याने त्याच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती.रोहित गोदारा अमेरिकेत असला तरी त्याचे देशातल्या अनेक राज्यांमध्ये प्रोफेशनल शूटर आहेत, अशी माहिती समोर आली आहे. रोहित गोदाराच्या ईशा-यावरच शूटर्स आणि ते कोणती बंदूक वापरणार हे ठरवण्यात आले.

तसेच या गोळीबाराची जबाबदारी घेणा-या फेसबूक पोस्टचा आयपी अ‍ॅड्रेस हा कॅनडातील असल्याचंही समोर आलं आहे. अनमोल बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. पोलिसांकडून या अकाऊंटची माहिती काढण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे.

सलमान खानच्या घरावर हा गोळीबार का करण्यात आला याबद्दल काही माहिती समोर आली आहे. बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सूत्रांनी दिलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशत निर्माण करायची असल्याने त्यांनी हा गोळीबारघडवून आणला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!