Sagar Kalbhor : ‘यशवंत’ कारखान्यावर ‘ब ‘ वर्ग मधून सागर काळभोर यांचा मोठा विजय..!!


Sagar Kalbhor उरुळीकांचन : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत ‘ब’ वर्ग बिगर सहकारी संस्था /उत्पादक संस्था व पणन संस्था मतदारसंघातून आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलचे उमेदवार सागर अशोक काळभोर हे १६८ मतांनी विजयी झाले आहे.

उरुळीकांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या ब वर्ग गट प्रतिनिधी गटाची मोजणी पूर्ण झाली. या गटात सागर अशोक काळभोर यांना २०१ तर या निवडणुकीत सागर काळभोर यांना पाठिंबा दिलेल्या संजय गायकवाड यांना ३३ मते तर ४ मते बाद ठरली आहे. Sagar Kalbhor

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या इतर २० जागांवर उशीर मतमोजणी सुरू झाली आहे. साधारण दुपारी १ च्या नंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होणार आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!