पुण्यात 17 एप्रिलपासून नियम बदलणार! HSRP प्लेट आता असणार अनिवार्य , न बसवणाऱ्यांना 10000 रुपयांचा दंड..


पुणे: सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्टर प्लेटसंदर्भात अत्यंत कडक पावले उचलली असून पुण्यात 17 एप्रिलपासून HSRP नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या वाहनांकडे विशेष नंबर प्लेट नसेल त्यांच्यावर आरटीओ आणि वाहतूक पोलीस कारवाई करणार आहेत. यामुळे वाहनधारकांना दहा हजार रुपये दंडाचा फटका बसणार आहे.

पुण्यात येत्या शुक्रवारपासून विना HSRP प्लेटच्या गाड्यांना 10000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. त्याशिवाय एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास गाडीशी संबंधित आरटीओची कामे, विम्याचे नूतनीकरण आणि कागदपत्रांची पडताळणी अशा महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे आर्थिक दंड वाचवण्यासाठी वाहनधारकांना नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे.

वाहनधारकांना HSRP या नंबरप्लेटसाठी अर्ज करायचं असेल तर त्यानी https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html यावर ऑनलाइन ऑर्डर करायची आहे. तुम्हाला तुमच्या वाहनाचा तपशील भरावा लागेल. तुमच्या वाहनाला एचएसआरपी बसवण्यासाठी तुम्हाला एक तारीख आणि वेळ कळवली जाईल

.हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एचएसआरपी ही सुरक्षेचा विचार करून तयार केलेली विशेष नंबर प्लेट आहे. त्यामध्ये विशिष्ट कोड आणि होलोग्राम असतात. या नंबरप्लेटमुळे प्रत्येक वाहन सहज ओळखता येते. बनावट नंबर प्लेट्स आणि चोरी यांसारख्या घटना टाळण्यास या नंबर प्लेटमुळे मदत होते. त्यामुळे सरकारकडून एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य केली आहे.

दरम्यान आतापर्यंत अनेकांनी ही नंबरप्लेट बसवली आहे. पण काही जणांनी अद्याप नंबर प्लेट बसवली नाही. त्यांना 17 एप्रिलनंतर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळेही लवकरच नंबर प्लेट बसवणे वाहनधारकांच्या हिताचे ठरू शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!