Rohit Pawar : ते २२ आमदार शरद पवार यांच्या गटात येतील!! रोहित पवारांनी केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ…
Rohit Pawar : सध्या शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. आगामी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादीचे २२ आमदार परत शरद पवारांकडे येतील, असे म्हटले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी मोठं घडतंय, असे म्हटले जात आहे. रोहित पवार म्हणाले, अजित पवार गटातला एक नेता आमदार एकत्रित करतोय. 10 ते 12 आमदार आहेत ते भाजपाच्या चिन्हावर लढायचं म्हणत आहेत.
राहिलेले २२ आमदार हे वेगळी भूमिका घेतील. त्यांच म्हणणं असेल की शरद पवारांसोबत चला. मग त्यांच्या पक्षात कोण राहील? असेही ते म्हणाले. बंद खोलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतील आमचं ऐकावं लागेल. अजित पवारांना लोकसभेच्या फक्त 4 जागा मिळतील. Rohit Pawar
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 10 जागा मिळतील. अमित शाहांचं त्यांना ऐकावंच लागेल. पण अजित पवारांची भूमिका त्यांच्या पक्षातील सगळ्याच नेत्यांना मान्य असेल असं नाही. यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत.
यामुळे आता येणाऱ्या काळात अजून काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या लोकसभा निवडणुक काही दिवसांवर आली असून उमेदवार अंतिम करण्याचे काम सध्या सुरू आहेत. यामुळे अनेकांनी फिल्डींग लावली आहे.