भोंदू खरात प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पैसे घेऊन अनेकांना…


मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. महिलांचे लैंगिक शोषण, भोंदुगिरीच्या माध्यमातून कोट्यवधींची संपत्ती आणि आर्थिक गैरव्यवहार अशा अनेक गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.

अशोक खरातचे काही राजकीय नेते, अधिकारी आणि नामांकित व्यक्तींशी संबंध असल्याचाही दावा केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटू लागले आहेत.

याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर मोठा गौप्यस्फोट केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

रोहित पवार म्हणाले की, भोंदू खरात प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी आणि व्यावसायिक अडकले असून आतापर्यंत या प्रकरणातील केवळ १ टक्के सत्यच बाहेर आले आहे. सध्या समोर आलेली नावे ही फक्त छोटे मासे आहेत. अजून अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय म्हणून या प्रकरणाची नोंद होऊ शकते.

तसेच त्यांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटले की, या प्रकरणातून काही जणांची नावे वगळण्यासाठी मोठे आर्थिक रॅकेट कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. मोठमोठ्या रकमा घेऊन काहींना तपासातून अलगद बाहेर काढले जात असल्याचे समजते.

ज्यांना या प्रकरणातून वाचवायचे आहे, त्यांना भोंदूविरोधात फसवणुकीची तक्रार करण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यानंतर त्यांची नावे बाजूला केली जातात, अशी माहिती समोर येत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!