रितेश देशमुखच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, पोस्ट करत म्हणाला, भावासारखी जपणारी सर्वात जवळची व्यक्ती गमावली..

मुंबई : बॉलिवूड आणि मराठी अभिनेता रितेश देशमुखने रात्री उशिरा त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक भावुक पोस्ट शेअर केली. रितेश देशमुखवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे मॅनेजर राजकुमार तिवारी यांचे निधन झाले आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रितेशने इंस्टाग्राम हँडलवर एक भावुक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

तो त्याच्या मॅनेजरला त्याच्या कुटुंबाचा एक भाग आणि मोठ्या भावासारखा मानत होता. आता त्याच्या अशा अचानक जाण्याने तो खूप दुःखी झाला आहे. जेव्हा त्याने ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हापासून राजकुमार तिवारी त्याच्यासोबत मॅनेजर म्हणून काम करत होते. यामुळे ते त्याच्या कुटूंबाचा भाग होते होते.
समजल्यावर खूप दुःख झाले आहे. राजकुमार तिवारी जी आता राहिले नाहीत. या गोष्टीमुळे माझे मन दुखावले आहे. ते माझे मार्गदर्शक, माझे मोठे भाऊ आणि माझे कुटुंब होते. असे त्यांबे म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्याने मॅनेजर राजकुमार तिवारी यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

राजकुमार तिवारीजींनी माझ्या पदार्पणापासूनच माझ्या कामाची काळजी घेतली होती. प्रत्येक कठीण काळात ते माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले.तिवारीजी तुम्ही कायम माझ्या स्मरणात राहाल. कुटुंबाप्रती – त्यांची मुलं सिद्धार्थ आणि सुजीत यांच्याप्रती संवेदना. अशी पोस्ट त्याने केली आहे.

त्यांनी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते फिरोज खान आणि विनोद खन्ना यांच्यासोबतही काम केले आहे. रितेश देशमुखने स्वतः मॅनेजरचा त्या दोन दिग्गजांसोबतचा एक अनसीन फोटो शेअर केला होता. माझे मॅनेजर राजकुमार तिवारी आमच्या इंडस्ट्रीतील दोन रॉकस्टार विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यासोबत, असे त्याने म्हटले आहे.