भिंडेंची मिशी कापणाऱ्याला १ लाखांचे बक्षीस!! वादग्रस्त वक्तव्यावरून वाद पेटला..
पुणे : समता परिषदेचे माजी जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी तर संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे. संभाजी भिडे यांनी देशात अशांतता पसरवण्याचे काम सुरु केले आहे.
भिडे हे महापुरुषांबाबत दररोज वेगवेगळे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे भिडेंची मिशी कापणाऱ्याला ओबीसी समाजाकडून वर्गणी करून एक लाखांचं बक्षिस देण्याची घोषणा नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.
शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे कायम या-ना त्या कारणाने चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत एक विधान करुन वाद ओढावून घेतला होता. त्यांच्या विधानानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
संतापलेल्या समता परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्याने संभाजी भिड यांची मिशी कापणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. समता परिषदेचे माजी जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी भिडेंची मिशी कापणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे.
संभाजी भिडे यांनी देशात अशांतता पसरवण्याचे काम सुरु केले आहे. भिडे हे महापुरुषांबाबत दररोज वेगवेगळे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे भिडेंची मिशी कापणाऱ्याला ओबीसी समाजाकडून वर्गणी करून एक लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.
संभाजी भिडेंनी काय म्हटले होते?
अमरावतीच्या बडनेर इथं झालेल्या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडेंनी महात्मा गांधींचे वडील करमचंद गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. करमचंद गांधी हे मोहनदास अर्थात गांधीजींचे खरे वडील नसून ते एका मुस्लीम जमीनदाराचे पुत्र होते, असे व