मुंबईत तिसऱ्याच दिवशी आरक्षणाचा गुलाल!!! मनोज जरांगे यांचा मोठा प्लॅन, जाणून घ्या…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. आता येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा वादळ मुंबईत येऊन धडकणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हाक दिली आहे. आता ही अंतिम लढाई असेल आता आरक्षण घेणारच असा एल्गार त्यांनी केला आहे.

आता मुंबईत आरक्षणाचा हुंकार घुमणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईसह राज्यात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. यामुळे सरकार निर्णय घेणार का? हे येणाऱ्या काळात समजणार आहे. यापूर्वी मुंबईच्या वेशीवर वाशी येथे मराठा वादळ धडकले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मागण्या मान्य केल्या होत्या. त्यातील काहींची अद्याप अंमलबजावणी झाली नाही.

तसेच ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना सरसकट आरक्षण न दिल्याने आता मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. याबाबत ते म्हणाले, 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसर्या दिवशी आरक्षणाचा गुलाल अंगावर पडला समजा. यावेळी तीन ते चार कोटी मराठे मुंबईला येतील असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

यामुळे सरकारने देखील धास्ती घेतली असून हालचाली वाढणार आहे. जरांगे पाटील यांच्याकडून परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील धारसुर येथे पारावरची चावडी बैठक घेण्यात आली. त्यावेळी जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केले. सध्या जरांगे याबाबत बैठका घेत आहेत.