सर्वात मोठी बातमी! राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर, उडणार राजकीय धुराळा…

पुणे : सध्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. यामध्ये पुणे सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद जाहीर करण्यात आलं आहे.

साताऱ्यात महिला मागासवर्गीय उमेदवारासाठी अध्यक्षपद असणार आहे. ठाण्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार आहे. यामध्ये नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग, धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), लातूर – सर्वसाधारण (महिला), अमरावती – सर्वसाधारण (महिला), अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
तसेच परभणी – अनुसूचित जाती, वाशिम अनुसूचित जमाती (महिला), बुलढाणा -सर्वसाधारण, यवतमाळ सर्वसाधारण, नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग, वर्धा- अनुसूचित जाती, भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग, गोंदिया – सर्वसाधारण (महिला), चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला), गडचिरोली -सर्वसाधारण (महिला) यासाठी असणार आहे.

तसेच ठाणे -सर्वसाधारण (महिला), पालघर – अनुसुसूचित जमाती, रायगड- सर्वसाधारण, रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सिंधुदुर्ग – सर्वसाधारण, नाशिक -सर्वसाधारण धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), नंदूरबार-अनुसूचित जमाती, जळगांव – सर्वसाधारण, अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला), पुणे – सर्वसाधारण, सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) यांना असणार आहे.

तसेच सांगलीत – सर्वसाधारण (महिला), सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला), छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण, जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), बीड- अनुसूचित जाती (महिला), हिंगोली -अनुसूचित जाती असे जाहीर करण्यात आले आहे.