हवेलीत ६६ ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर! हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडून सोडत जाहीर…


उरुळीकांचन : हवेली तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत बुधवारी (दि.२३) हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली आहे. १९९५ च्या आरक्षणाची वर्तूळाकार पद्धतीने अणुसूचित जाती-जमातींचे आरक्ष णाची फेरी पूर्ण करीत लोकसंख्येच्या निकष धरुन आरक्षणे तसेच चिठ्ठी पध्दतीने पुढील आरक्षणे तहसिलदार किरण सुरवसे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात हवेली तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीची सरपंचपदाची सोडत काढण्यात आली आहेत. तर५ ग्रामपंचायतीची सोडत यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आली आहे. हवेलीचे तहसिलदार किरण सुरवसे यांनी सोडत प्रक्रीयेची माहिती देऊन प्राधान्यक्रम अणुसूचित जाती -जमाती , भटक्या जाती -जमाती, मागासवर्गीय स्त्री, पुरुष व सर्वसाधारण गटातील गटातील आरक्षणे काढण्यात आली आहे.यावेळीअप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील,निवासी नायब तहसीलदार स्वामी नरुटे, महसूल नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या उपस्थितीत आरक्षणे काढण्यात आली.

पुढील ग्रामपंचायतींच्या सरपंचदाची आरक्षणे पुढीलप्रमाणे…

अणुसूचित जाती स्त्री
आगळंबे, वळती, रहाटवडे, केसनंद, टिळेकरवाडी.

अणुसूचित पुरुष
खामगाव मावळ, भावडी, बुर्केगाव, शिंदवणे, तरडे

भटक्या विमुक्त जाती स्त्री
वरदाडे

भटक्या विमुक्त जाती पुरुष
शिंदेवाडी

मागासवर्गीय स्त्री
वडकी, जांभळी, आंबी, पेठ, प्रयागधाम, सांगरुण, मणेरवाडी, शिवापूर, वढु खूर्द, कोरेगावमूळ

मागासवर्गीय पुरुष
निरगुडी, मांडवी खुर्द, कुडजे, गोगलवाडी, कोंढणपूर, डोंगरगाव, खामगाव टेक, सोरतापवाडी, गोर्हे बुद्रुक

सर्वसाधारण स्त्री
कल्याण, मांजरी खुर्द, खडकवाडी, मांडवी खुर्द, मांडवी बुद्रुक, आर्वी, गाऊडदरा, खेड शिवापूर, श्रीरामनगर, घेरा सिंहगड, आव्हाळवाडी, आळंदी म्हातोबा, कुंजीरवाडी, लोणीकाळभोर, थेऊर, कदमवाकवस्ती, कोलवडी-साष्टे, भवरापूर, हिंगणगाव, सांगवी सांडस, नायगाव

सर्वसाधारण पुरुष
वडगाव शिंदे, फुलगाव, बहुली, आहेरे, मालखेड, खाणापूर , डोणजे, गोन्हे खूर्द, सोनापूर, बकोरी, बिवरी, शिरसवडी, तुळापूर, पिंपरी सांडस, पेरणे, वाडेबाल्हाई, लोणीकंद, अष्टापूर, न्हावी सांडस, उरुळीकांचन.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!