अमित शाह चंद्रकांत पाटीलांवर नाराज, बाळासाहेबांबद्दलच्या वक्तव्यावरून खडसावले…!

मुंबई : भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने आता पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे म्हटले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी चंद्रकात पाटील यांना खडसावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बाळासाहेबांबद्दल केलेल्या वक्तव्यावर अमित शहांनी नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना शिवसैनिकसुद्धा बाबरी मशीद पाडताना तेथे होते, असे सांगितले. मात्र, त्यांनी केलेल्या वक्तव्यावर अद्यापही टीका केली जात आहे.
चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या शब्दांचा विपर्यास केला गेला. बाळासाहेबांची भूमिका आम्हाला मान्य असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हटले की, अनेक दिवस जेलमध्ये राहून ते अनेक भाषा शिकलेत, येणारी पिढी हे पाहते आहे, त्यांनी भाषा सुधारावी, इतकेच आम्ही म्हणू शकतो. सत्ता गेल्याने ते रिकामे आहेत आणि बावचळले आहेत, असे बावनकुळे म्हणाले.