यवतमध्ये दंगल सदृश्य परिस्थिती! दोन समाजातील धार्मिक वाद चिघळला! जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदी आदेश जारी….


यवत: पुणे जिल्ह्यातील यवत गावात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) सकाळी यवतमधील एका मुस्लिम युवकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली. त्याचे पर्यवसान हिंसेत झाले असून वाहने पेटविणे, घराला आग लावणे तसेच मशिदीची प्रचंड प्रमाणात मोडतोड करण्यात आली आहे.

यवतमध्ये यापूर्वीच, २६ जुलै रोजी नीलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. त्या घटनेचा संताप अद्याप शमलेला नसतानाच, अवघ्या काही दिवसांतच दुसरा वादग्रस्त प्रकार घडल्याने वातावरण आणखी पेटले आहे.

युवकाच्या घरावर हल्ला; पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

सदर आक्षेपार्ह पोस्ट करणारा युवक सहकार नगर, यवत या भागातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संतप्त नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सहकार नगर भागात धाव घेत, त्या युवकाच्या घरावर दगडफेक आणि तोडफोड केली. काही काळासाठी परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, वेळेवर पोलीस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, युवकाच्या घराची हानी झाल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत तातडीने बंदोबस्त वाढवला आहे.

जाळपोळ आणि मशिदीची तोडफोड

या संतप्त जमावाने यवत गावातील काही दुचाकी गाड्यांनाही पेटवून दिले, तसेच गावातील एका मशिदीची तोडफोड केल्याचीही माहिती आहे. यामुळे परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून यवत परिसरात तातडीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर असून, नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास न ठेवावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मागील घटनांचा संदर्भ आणि वाढलेली संवेदनशीलता

२६ जुलै रोजी घडलेल्या नीलकंठेश्वर मंदिरातील पुतळा विटंबनेच्या घटनेमुळे यवत परिसर आधीच संवेदनशील बनला आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एकदा धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल झाल्याने वातावरण पूर्णतः तणावपूर्ण बनले आहे. पोलीस आता संबंधित पोस्ट करणाऱ्या युवकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करत असून, सोशल मीडियावर कोणतीही चिथावणीखोर माहिती प्रसारित होऊ नये यासाठी सायबर सेलसह विशेष पथक कार्यरत आहे.

यवतमध्ये जमावबंदी आदेश जारी …

यवतमध्ये दोन धार्मिक समाजात झालेल्या विवादाने हिंसक रूप घेतल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी परिस्थितीची माहिती घेऊन यवत परिसरात तातडीने जमावबंदीचे आदेश जारी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!