Ration Card : रेशनचे धान्य घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आता महिनाभरातच गहू-तांदूळ घ्या नाहीतर..


 Ration Card पुणे : रेशनचे धान्य Ration Card घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे धान्य पूर्वी त्या महिन्यात घेतले नसल्यास पुढील महिन्याच्या सात दिवसांत घेण्याची मुभा होती. मात्र, आता ही मुभा बंद करण्यात आली असून, त्याच महिन्यात धान्य घेण्याची सक्ती करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. Ration Card

त्यामुळे उर्वरित धान्याचा होणारा काळाबाजार रोखणे शक्य होणार असून, या संदर्भात अन्न नागरी पुरवठा विभागाने राज्यातील सर्व स्वस्त धान्य विक्रेत्यांना परिपत्रक पाठवले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ देण्यात येतो. मात्र, लाभार्थी एकाच वेळी हे धान्य घेत नाहीत. त्यामुळे त्यांना पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत धान्य घेण्याची परवानगी देण्यात आली होती. Ration Card

त्यामुळे एकदा धान्य घेण्याचे चुकले, तरी पुढील सात तारखेपर्यंत मुदत मिळाल्याने मागील व चालू महिन्याचे असे दोन वेळचे धान्य एकाच वेळी लाभार्थ्याला मिळणे सोपे झाले होते. मात्र, यामुळे शिल्लक धान्याचा साठा आणि अतिरिक्त साठा यांची बेरीज वजाबाकी करण्याचे काम विक्रेत्यांना करावे लागत होते.

तसेच यातून स्वस्त धान्य विक्रेते गैरफायदा घेऊन त्या धान्याचा काळाबाजार करण्याची शक्यता होती. शिल्लक धान्याची विक्री करणे बंधनकारक असल्याने त्याचा हिशोब शहराच्या अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांसह जिल्ह्याच्या पुरवठा अधिकाऱ्याला देणे भाग होते. त्या वेळी अधिकाऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याचे आढळले. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!