Raosaheb Danve : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या वाहनाचा अपघात, पिकअपने जोरदार धडक दिली अन्….


Raosaheb Danve : छत्रपती संभाजीनगरमधून अपघाताची एक बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित अपघाताची घटना ही धुळे-सोलापूर महामार्गावर चाळीसगावमध्ये घडली आहे. या अपघातात संजना जाधव आणि गाडीचा चालक हा थोडक्यात बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पिकप चालकाने जाधव यांच्या चालकाच्या बाजूने समोरून येत धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात संजना जाधव, चालक आणि इतर कार्यकर्ते थोडक्यात बचावले आहे.

अपघाताच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघात घडल्यानंतर लगेच स्थानिकांनी बचावासाठी धाव घेतली. तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनीदेखील बचावासाठी धाव घेतली. Raosaheb Danve

यावेळी गाडीतील संजना जाधव आणि त्यांच्या गाडीचा चालक सुखरुप असल्याची माहिती समोर आली. तसेच संजना जाधव यांच्या गाडीला धडक देणारा पिकअप ड्रायव्हर सुद्धा सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना या कन्नड येथून आगामी विधानसभा निवडूनक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने अनेक चर्चा आता रंगू लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!