महाराष्ट्राला हादरवणारी घटना! हॉस्टेलमधून पळाली, चार जिल्हे भटकली अन्…विद्यार्थिनीवर ४ ठिकाणी ४ जणांकडून अत्याचार

मुंबई : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे

आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपींनी पीडित मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला आहे. मुलगी हॉस्टेलमधून गायब झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता ती पुण्यात असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानुसार पोलिसांनी पीडितेचा माग काढला, तिला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं, तेव्हा तिने जे सांगितलं, ते ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी समाधान शिंदे (रा. पुणे), निखिल बोर्डे (नाशिक), प्रदीप शिंदे (परभणी) आणि रोहित ढाकरे (पुसद) अशा चार जणांना अटक केली आहे.
नेमकं घडलं काय?
१७ वर्षीय मुलगी नीट परीक्षेची तयारी करत आहे. ती छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉस्टेलमध्ये राहत होती. अभ्यासाच्या तणावातून ३० नोव्हेंबरला तिचा आई-वडिलांशी वाद झाला. या वादानंतर रागाच्या भरात मुलगी हॉस्टेलमधून निघून गेली.
त्यावेळी तिच्याकडे अवघे २०० रुपये होते. त्यामुळे ती एसटी, रेल्वे आणि मिळेल त्या वाहनाने प्रवास करायला सुरुवात केली. ती नाशिक यवतमाळ, परभणी आणि पुणे अशा चार जिल्ह्यात फिरली. पण या चारही जिल्ह्यात वेगवेगळ्या तरुणांनी तिच्यावर मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला. या घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरले आहे,