Ram Shinde : विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड..

Ram Shinde : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विधानपरिषदेमध्ये आज सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सर्व नेत्यांनी राम शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना सभापतीपद द्यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण भाजपने हे पद शिवसेनेला देण्यास नकार दिला होता. त्यानंतर भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. Ram Shinde
दरम्यान, आज त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सभापती पदासाठी श्रीकांत भारतीय यांनी प्रस्ताव मांडला. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी सभापती म्हणून एकमताने राम शिंदे यांना निवडण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.