‘राजा शिवाजी’चा तुफान गाजावाजा! 3 दिवसांत प्रेक्षकांच्या मनात घर, कमाई ऐकून थक्क व्हाल..


मुंबई : रितेश देशमुखचा ऐतिहासिक चित्रपट राजा शिवाजी हा सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे. हिंदीसोबतच मराठी प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असून, रिलीजच्या तिसऱ्या दिवशीही सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे.

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने विक्रमी ओपनिंग घेत मराठी बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही कमाई स्थिर राहिली आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाने जोरदार मुसंडी मारली.

सॅकनिल्कच्या अंदाजानुसार, राजा शिवाजी ने पहिल्या दिवशी 11.35 कोटी, दुसऱ्या दिवशी 10.55 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 12 कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे तीन दिवसांत एकूण 33.90 कोटींचा गल्ला चित्रपटाने जमवला आहे.

चित्रपटात सर्वाधिक योगदान मराठी आवृत्तीचे असल्याचे दिसत असून, हा सिनेमा यंदाचा मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा भव्य ऐतिहासिक चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभिमानाचा उत्सव ठरत आहे. राज्यभरात तसेच राज्याबाहेरही प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे वळताना दिसत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!