राज ठाकरे यांची मुंबईत सभा मात्र पुण्याचे चित्र बदलणार, मनसे नेत्यांचे मोठे वक्तव्य…!

पुणे : आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला मुंबईत सभा होत आहे. या सभेमध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मनसैनिक उपस्थित राहणार आहेत.

या सभेची पुण्यातच जास्त चर्चा सुरू आहे. पुणे जिल्ह्यातून मनसेचे 20 हजार कार्यकर्ते मुंबईसाठी जाणार आहे, असे मनसे नेते बाबू वागस्कर आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले.


यामुळे पुण्यातील वातावरण ढवळून निघणार आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर ही सभा होत आहे. संपूर्ण पुणे शहरातील वातावरण राज ठाकरेमय झाले आहे. त्यामुळे या सभेनंतर राज्याला नवी दिशा मिळणार आहे आणि पुणे शहराचे चित्र बदलणार असल्याचे बाबू वागस्कर यांनी सांगितले.
गुढीपाडव्याला होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मुंबईत होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याची पुण्यात देखील जोरदार तयारी सुरु आहे.