Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सर्वात मोठी आघाडी, विधानसभा निवडणुकीतील दोन उमेदवारांची घोषणा..


Raj Thackeray : आगामी काळात म्हणजेच साधारण ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती तसेच महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

दरम्यान, त्याआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक बाळा नांदगावकर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकांना किमान दोन ते तीन महिन्यांचा अवधी आहे, तर निवडणुकांचे बिगुल वाजण्यासही अवकाश आहे. मात्र त्याआधीच मनसेने दोन शिलेदार जाहीर करत आघाडी घेतली आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघातून २००९ मध्ये आमदार राहिलेल्या बाळा नांदगावकर यांना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा तिकीट दिलं आहे.

शिवडी विधानसभा मतदारसंघ सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे आहे. पक्षाचे प्रतोद अजय चौधरी येथून आमदार आहेत. त्यामुळे शिवडीतून तिहेरी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.

दुसरीकडे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उमेदवार देत राज ठाकरेंनी स्वबळाचा आवाज घट्ट केला आहे. सोबतच महायुतीच्या पर्यायावरही काट मारली आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकांत तिहेरी लढती होण्याचे संकेत मिळत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!