महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! या तारखेपासून मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा इशारा


पुणे : जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीला राज्यात जोरदार हजेरी लावली. १ ते ६ जुलैदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील पाणीपातळीत वाढ झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने उकाडा वाढला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत कोकणासह राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असून आता पावसाची प्रतीक्षा आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा हिस्सार, मेरठ, गोरखपूर ते आसामपर्यंत सक्रिय आहे. तसेच ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र, काही भागांत उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने १३ जुलैपासून पुढील काही दिवस राज्यातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आज बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. दुपारच्या वेळी उकाडा जाणवू शकतो, तर काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!