पावसाने रेल्वे सेवा कोलमडली! १६ गाड्या रद्द, अनेक एक्स्प्रेसचे मार्ग बदलले; मध्य रेल्वेची मोठी अपडेट

पुणे : मुंबई–पुणे मार्गावरील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. कर्जत–लोणावळा घाटातील ठाकूरवाडी–मंकी हिल परिसरात दरड कोसळल्याने रेल्वे मार्गाचे नुकसान झाले असून, त्याचा फटका मुंबई–पुणे रेल्वे वाहतुकीला बसला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने १६ गाड्या रद्द, अनेक गाड्यांचे मार्ग बदल, काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट आणि काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केल्याची घोषणा केली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या

22105 / 22106 – CSMT–पुणे–CSMT इंद्रायणी एक्स्प्रेस
12169 / 12170 – पुणे–सोलापूर–पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
12127 / 12128 – CSMT–पुणे–CSMT इंटरसिटी एक्स्प्रेस
11007 / 11008 – CSMT–पुणे–CSMT डेक्कन एक्स्प्रेस
12123 / 12124 – CSMT–पुणे–CSMT डेक्कन क्वीन
12125 / 12126 – CSMT–पुणे–CSMT प्रगती एक्स्प्रेस
11009 / 11010 – CSMT–पुणे–CSMT सिंहगड एक्स्प्रेस
11011 / 11012 – CSMT–धुळे–CSMT धुळे एक्स्प्रेस
मार्ग बदललेल्या गाड्या
11049 – अहमदाबाद–कोल्हापूर एक्स्प्रेस
22944 – इंदूर–दौंड एक्स्प्रेस
12297 – अहमदाबाद–पुणे दुरांतो एक्स्प्रेस
22144 – बिदर–CSMT एक्स्प्रेस
17614 – नांदेड–पनवेल एक्स्प्रेस
20915 – लिंगमपल्ली–इंदूर हमसफर एक्स्प्रेस
22160 – चेन्नई सेंट्रल–CSMT एक्स्प्रेस
11014 – कोईमतूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
12164 – चेन्नई सेंट्रल–एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेस

अर्ध्या मार्गावरच थांबवण्यात आलेल्या गाड्या
20822 – संत्रागाछी–पुणे हमसफर एक्स्प्रेस (पनवेलपर्यंत)
12116 – सोलापूर–CSMT सिद्धेश्वर एक्स्प्रेस (पुण्यापर्यंत)
22731 – हैदराबाद–CSMT हुसेन सागर एक्स्प्रेस (पुण्यापर्यंत)
22226 – सोलापूर–CSMT वंदे भारत एक्स्प्रेस (पुण्यापर्यंत)
बदललेल्या स्थानकावरून सुटणाऱ्या (Short Originate) गाड्या
12701 – पुणे–हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेस
22225 – पुणे–सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस
20821 – पनवेल–संत्रागाछी हमसफर एक्स्प्रेस
11301 – पुणे–बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस

वेळेत बदल
18520 – एलटीटी–विशाखापट्टणम एक्स्प्रेस (सकाळी ९:५५ वाजता)
11029 – मुंबई–कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस (सकाळी ११:४० वाजता)
20706 – मुंबई–नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस (दुपारी ३:१५ वाजता)
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर जाण्यापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासावी, तसेच मुसळधार पावसामुळे परिस्थितीनुसार आणखी बदल होऊ शकतात, असे स्पष्ट केले आहे. दरड हटविण्याचे आणि रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.